शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

प्रेरणास्थळ आयोजन समितीतर्फे देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

By admin | Published: January 07, 2017 12:33 AM

गणराज्य दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ ....

यवतमाळ : गणराज्य दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे येथे देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ स्थानिक दर्डानगरातील प्रेरणास्थळावर दुपारी ४ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धा एकाच गटासाठी होणार असून प्रवेश विनाशुल्क आहे. सादरीकरणासाठी सात मिनिटांचा वेळ दिला जाईल. प्रत्येक समूहात स्पर्धक संख्या गायक दहा, तर पाच साथीदार आवश्यक आहे. स्पर्धेचे पहिले बक्षीस १५००, दुसरे एक हजार, तिसरे ७५१ रुपये आहे. सर्व गायक स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सोबत सहभागी स्पर्धकांचे ओळखपत्र किंवा शाळेच्या लेटरहेडवर यादी द्यावी लागेल. दिल्या गेलेल्या क्रमांकानुसारच गीत सादर करावे लागणार आहे. या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. अजय कोलारकर आहेत. अधिक माहितीसाठी ८८०५८८५६६८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले आहे. (वार्ताहर)