लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील खंडाळा भागात रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना बिबट्या वाघाचे दर्शन झाले . हा भाग घनदाट वनराईंनी नटलेला आहे . तसेच या भागात हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य देखील आहे . बिबट्या हा तसा लाजाळू प्राणी . हा अतिषशायी चपळ प्राणी . पोहण्यात निष्णात . झाडावर चढून आपले देखील हा शिकार करतो . दुसरं वैशिष्ठ असं आपल्या वजनाच्या दीडपट वजन घेऊन तो झाडावर चालू शकतो . त्याच्या चालण्यातील डौलदारपणा बघून पोलिसांना VDO काढण्याचा मोह आवरला नाही .
यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात गस्ती पोलिसांना झाले बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:18 AM