शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

पुसद नगरपरिषद समिती सभापतींची निवड अविरोध

By admin | Published: January 13, 2017 1:34 AM

येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे यांची निवड झाली असून बांधकाम सभापतीपदी

कार्यकर्त्यांचा जल्लोष : पाणीपुरवठा चौथ्यांदा राजू दुधे यांच्याकडे पुसद : येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे यांची निवड झाली असून बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी शहर आघाडीच्या साबेराबी जकी अन्वर यांची गुरुवारी निवड करण्यात आली. पुसद नगरपरिषदेत सभापती व विषय समित्यांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी नियोजन सदस्य पदी राजेश साळुंके (राष्ट्रवादी), डॉ. मोहंमद नदीम (राष्ट्रवादी विकास आघाडी) व निरज पवार (भाजपा) यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी साबेराबी जकी अन्वर, शिक्षण समिती सभापती शेख फिरोज अफसर, आरोग्य सभापतीपदी अ‍ॅड. भारत जाधव, पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दीपाली धुळे व नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेला नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, प्रशासन अधिकारी उत्तमराव डुकरे, सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभापती निवडीच्या वेळी सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सभापतींची निवड पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)उमरखेडमध्ये भाजपा-सेनेचे वर्चस्व उमरखेड - येथील नगरपरिषदेच्या सभापती व विषय समित्यांची निवड गुरुवारी अविरोध पार पडली. या समित्यांवर भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व राहिले. बांधकाम समिती सभापतीपदी बाळासाहेब केशवराव नाईक, शिक्षण समिती सभापतीपदी प्रकाश दुधेवार, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संदीप ठाकरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी दिलीप सुरते, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी अरविंद भोयर आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनुप्रिता देव यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष नामदेव ससाने स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असून या समितीत उपाध्यक्ष अरविंद भोयर, बाळासाहेब नाईक, दिलीप सुरते, प्रकाश दुधेवार, अनुप्रिता देव, संदीप ठाकरे, अमोल तिवरंगकर, नितीनकुमार भुतडा, अविनाश अग्रवाल यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेत निवड सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी सहायक म्हणून काम पाहिले. यावेळी माजी आमदार उत्तमराव इंगळे, गजेंद्र ठाकरे, रेखा गवळे, कविता खंदारे, ज्योती इंगळे, सरिता पाचकोरे उपस्थित होते. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त केला. सभापतींच्या निवडीच्या वेळी नगरसेवकांसह अनेक समर्थकही उपस्थित होते. आजच्या निवडीवर शिवसेना आणि भाजपाचे वर्चस्व दिसून आले.