शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

मित्राच्या मारेकऱ्याला मंगळवारपर्यंत पीसीआर

By admin | Published: January 08, 2017 1:05 AM

तालुक्यातील मोख क्र.२ येथे गवंडी काम करणाऱ्या मित्राचा चाकूने खून केल्याची घटना ६ जानेवारीला उघडकीस आली होती.

मोखचे खून प्रकरण : घटनास्थळावरून कपडे आणि चाकू जप्त दिग्रस : तालुक्यातील मोख क्र.२ येथे गवंडी काम करणाऱ्या मित्राचा चाकूने खून केल्याची घटना ६ जानेवारीला उघडकीस आली होती. शनिवारी आरोपीचा कबुली जवाब घेवून दिग्रस पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपी कैलास भगत याने आपला मित्र समाधान श्रीराम भगत याला गुरुवारी रात्री दारू पिण्यास नेले. परत येताना त्यांच्यात वाद होवून कैलास रस्त्यावर पडला. आपल्या परिवाराला समाधानने अपशब्द बोलल्याचा राग मनात ठेवून कैलासने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात घटनास्थळावरच समाधानचा मृत्यू झाला. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. संशयावरून पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. बऱ्याच वेळानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी त्याचा कबुली जवाब घेवून पोलिसांनी मोख क्र.२ येथील घटनास्थळ गाठले. तेथे पोहोचल्यावर आरोपीने परिसरात लपवलेले रक्ताळलेले कपडे व हत्त्येकरिता वापरलेला चाकू काढून दिला. आरोपीने शासकीय पंचांच्या समक्ष हत्त्येचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आरोपी कैलासला दुपारी दिग्रस न्यायालयात नेण्यात आले. हत्त्येच्या वेळी त्याला कोणी मदत केली का, कोणी सहकारी होते का या तपासाकरिता न्यायालयाने आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात तपास करून पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, हेड कॉन्स्टेबल नारायण पवार, कॉन्स्टेबल दत्ता पवार, रूपेश चव्हाण यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)