या बैठकीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू मोटेमवार, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले यांच्यासह बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासोबतच इतर सामूहिक कार्यक्रम हे शांततेत पार पडेल, अशी ग्वाही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.किशोर वैद्य, दामोदर बाजोरिया, नटवर शर्मा, संजय झोटिंग, मुन्ना जैन, गोपाल बाजोरिया, रफीक खान, युनूस खान तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी केले. यावेळी किशोर वैद्य, नटवर शर्मा यांनी नगरपरिषद व पोलीस विभागाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसलेली अल्पवयीन मुले ३-३ जण बसून भरधाव दुचाकी चालवतात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतो. अनेकदा अपघातही घडले आहे. याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. तातडीने याचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी दिली.
पांढरकवडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:45 AM