लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरीमोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सर्व मोर्चेकरी एकत्रित आले. त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. शिवाजी चौक, शंकर टॉकिज चौक, दुगार्माता चौक, घंटीबाबा चौकमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मोर्चेकºयांनी शासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी चौकातचौकात फटाके फोडून मोर्चाचे स्वागत करण्यात आले.तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला मानोरा येथील माजी आमदार अनंतकुमार पाटील, संजय देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून महाराष्ट्र शासनाने राज्यातील १८१ तालुक्यात दुष्काळ घोषित केला असून मदत व सवलतीत तफावत दिसत असल्याचा आरोप केला.या तफावतीमुळे तालुक्यातील शेतकरी बांधव विविध मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती आहे. पीक पैसेवारी ४८ टक्के असूनही शासनामार्फत दिल्या जाणारे बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी १८ हजार व सहा हजार ८०० रुपयांच्या मदतीपासून शेतकरी बांधव वंचित राहणार आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी केली.तसेच तालुक्यातील शेतकरी पाल्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायिक आदी शैक्षणिक शुल्कात शुल्क माफी द्यावी, अशी मागणी केली. मोर्चात पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, जावेद पटेल, जावेद पहेलवान, सै.अक्रम, रवींद्र अरगडे, दीपक वानखडे, साहेबराव पाटील, डॉ.प्रदीप मेहता, रामकृष्ण इंगोले, रमेश गाडे, दीपक कोठारी, सुदाम राठोडसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चाने दिग्रसकर नागरिकांचे लक्ष वेधले होते.
दिग्रस तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:56 PM
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.
ठळक मुद्देदुष्काळी सवलती द्या : शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा पुढाकार