शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:34 PM

गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.

ठळक मुद्देविकासाचा ध्यास : सरपंच प्रवीण ठाकरे ठरले ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.अशा या सरपंचाच्या कार्याचा गौरव ‘लोकमत’ने सरपंच आॅफ द इअर पुरस्कार देऊन केला.महागावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर करंजखेड आहे. माहूर दर्शनासाठी जाणाºया भक्तांच्या विश्रांतीचे हे ठिकाण. या ठिकाणी भक्तांना हमखास भोजन आणि निवास उपलब्ध होतो. त्यामुळेच वर्षभर दिंड्या करंजखेडवरूनच जातात. या गावातील ठाकरे कुटुंब या भक्तांसाठी सर्व व्यवस्था करतात. अशा या सेवाव्रती ठाकरे कुटुंबातील तिसºया पिढीचे वारस म्हणजे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण ठाकरे. त्यांनी बीए, डीएड केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता ग्रामविकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले ते जल व्यवस्थापनावर. तळ्यातील दहा हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढला. त्यामुळे पाण्याची समस्या चुटकीसरशी मिटली. त्यांच्या या कार्याचा जिल्हा परिषदेने गौरव केला. नंतर त्यांनी सौरऊर्जेचे महत्त्व गावकºयांना समजून सांगितले. त्यातून अनेक शेतकºयांनी सौरपंप उभारले. वीज बचतीसाठी गावात एलईडी लाईट लावली. त्यामुळे ७० टक्के वीज झाली. गावात डिजिटल शाळा साकारली. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या दोन लाखातून डिजिटल प्रोजेक्टर बसविण्यात आले.स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र देत त्यांनी तरुणांना एकत्र केले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून गावाची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे सुरू झाली. आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन आणि रोजगार निर्मिती असे उपक्रम राबविले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. करंजखेड ग्रामपंचायतीअंतर्गत ५९३ हेक्टर शेती असून यातील ४० टक्के शेती ओलिताखाली आहे.करंजखेडने तंटामुक्तीचा तीन लाखांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. गावात दारूबंदीचा ठराव एकमताने पारित करून गाव शंभर टक्के व्यसनमुक्त करण्यात आले. सरपंच ठाकरे यांच्या या उपक्रमात संदीप ठाकरे, उपसरपंच भरोस चव्हाण, अविनाश भांगे, बच्चू राठोड, सुमन जाधव, मंदा भांगे, कलाबाई भांगे, हरिभाऊ ठाकरे, लक्ष्मीबाई बोरकर, दीपाली भांगे, विनोद चौधरी, अविनाश ठाकरे, प्रवीण भांगे, भीमराव भालेराव, योगीता तांबूतकर आणि गावकरी सहकार्य करतात. समन्वयाचे काम ग्रामसेवक के.पी. घारड करतात.पर्यावरण संवर्धनाचा मंत्रडोंगरदऱ्यांत वसलेल्या करंजखेड येथील गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता गावातील प्रत्येक घरी गॅस कनेक्शन आहे. परिणामी जंगलतोड थांबली आहे. दरवर्षी ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते.ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्यकरंजखेड येथे कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसभा घेतली जाते. नागरिकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य दिले जाते. कामात कोणती अडचण आल्यास सर्व मिळून ते सोडविले जाते. जिल्ह्यातील हे आदर्श गाव आता राज्यस्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.