शहरं
Join us  
Trending Stories
1
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
2
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
3
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
4
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
5
“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
6
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
7
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
8
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
9
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
10
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
11
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
12
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
13
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
14
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
15
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
16
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
17
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!
18
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
19
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक
20
पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल

लोक म्हणाले पडाल...तरी ते धावले अन् जिंकलेही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:23 PM

पायात कमरेपर्यंत पोते घालून चिमुकले हर्षातिरेकाने धावत होते. बघणारे लोक म्हणाले, अरे धावू नका, पडाल... पण तरीही ते धावलेच अन् जिंकलेही. लोक आपले विजयी चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत, हे बघायलाही त्या चिमुकल्यांना फुरसदच नव्हती. कारण त्यांना डोळेच नाहीत!

ठळक मुद्देअंध विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव : पिंपळगावात रंगल्या विविध स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पायात कमरेपर्यंत पोते घालून चिमुकले हर्षातिरेकाने धावत होते. बघणारे लोक म्हणाले, अरे धावू नका, पडाल... पण तरीही ते धावलेच अन् जिंकलेही. लोक आपले विजयी चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत, हे बघायलाही त्या चिमुकल्यांना फुरसदच नव्हती. कारण त्यांना डोळेच नाहीत!अंध विद्यार्थ्यांची ही स्पर्धा डोळसांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शनिवारी यवतमाळलगतच्या पिंपळगाव परिसरात ही स्पर्धा झाली. निवासी अंध विद्यालयाने लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त ४ ते ६ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. शनिवारी या उत्सवाच्या समारोपापूर्वी अनोखी स्पर्धा घेण्यात आली. अंध विद्यार्थ्यांनी धावायचे. त्यातही पायात पोते घालून धावायचे. डोळे नाहीच, पायही नाहीत... तरी विद्यार्थी आनंदाने धावले. त्यात रेणुका चव्हाण, प्रतिभा खुडे, प्रशांत मडावी, माधव राजूरकर, आकाश कांबळे, मालू जाधव या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. पोते घालून उड्या मारताना हरण्या-जिंकण्यापेक्षा मुग्धपणे हसण्याचाच सोहळा होता. हसण्यासाठी जिंकणेच गरजेचे नसते, हे या मुलांनी सिद्ध केले.अंध विद्यार्थी म्हणजे असहायता, असाच अनेकांचा समज असतो. पण या विद्यार्थ्यांनी अंताक्षरी स्पर्धेत दाखविलेला उत्साह निराश मनांना तजेला देणारा होता. ‘ओ पालन हारे निर्गण ओ न्यारे, तुम्हरे बिन हमरा कौनो नाही’ हे गीत त्यांच्या तोंडून ऐकताना श्रोत्यांना त्यांच्या अपंगत्वाची जाणीव झाली. पण लगेच ‘यारा ओ यारा तेरी अदाओ ने मारा’ म्हणत विद्यार्थ्यांनी आपले ‘सामान्यत्व’ सिद्ध केले. मुली आणि मुलांच्या गटात रंगलेल्या अंताक्षरीदरम्यान दोन्ही गट एकमेकांवर विनोद करीत हसत होते, गाणी गात होते. एकमेकांना चिडवित, चिमटे घेत दंगामस्ती करताना हे चिमुकले स्वत:चे वैगुण्य विसरून गेले अन् प्रेक्षकही!