शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

जनतेच्या रक्षकांचे जीर्ण घरांत वास्तव्य, कुटुंबीयांचीही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 6:19 PM

बिटरगाव पोलिस ठाणे: ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बिटरगाव येथे पोलिस ठाणे व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने जनतेचे रक्षकच असुरक्षित झाले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सतत जीर्ण घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांची चिंता सतावत राहते. बिटरगाव पोलिसांना ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

बिटरगाव येथे ब्रिटिश काळात पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली गेली. वेळोवेळी त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत घेऊन पोलिस कुटुंबांना वास्तव्य करावे लागत आहे. बंदी भागातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि ३२ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या घराची दैनावस्था झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी मुरून निवासस्थानाच्या भिंती फुगल्या आहेत. अखेर पोलिसांनीच निवासस्थाने व ठाण्यावर टिनाचे शेड टाकले आहे. 

बिटरगाव हा परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो. पोलिसांना ४५ गावांचा डोल्हारा सांभाळावा लागत आहे. ही एक प्रकारची कसरतच मानली जाते. या भागात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. यामुळे येथे काम करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी येण्याचे टाळतात. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्णब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण झाली. देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये नवीन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, ७० वर्षांनंतरही हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थाने ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यंदा परतीच्या पावसाने ठाण्यात वायरलेस कक्षातील पीओपीच्या छताला छिद्रे पडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी साधे निवासस्थान मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय ठाण्यातील वाहनही जुने झाले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास पोहोचण्यासाठी अडचण जाते. 

ग्रामपंचायत ठरावाकडे दुर्लक्षनिवासस्थानाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत वारंवार ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधितांकडे निवासस्थाने व ठाण्याच्या वास्तूची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बिटरगाव हे बंदी भागात मोडते. या परिसरात घनदाट जंगल आहे. काही वर्षांपूर्वी या जंगलात नक्षल्यांचाही वावर होता. त्यामुळे बिटरगावचे पोलिस ठाणे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ