रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे.निसर्गाच्या लहरीपणाने दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हवामानाची बिनचूक माहिती मिळत नसल्याने त्यांचे नियोजन कोलमडून पडते. आता अचूक अंदाज वर्तविणारे महावेध सॉफ्टवेअर गावपातळीवर बसविण्यात येत आहे. याकरिता महसुली मंडळांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर बसविल्यानंतर संबंधित महसूल मंडळातील गावांतील पाऊस, पावसाच्या खंड, हवेचा वेग, उन्ह आणि मान्सूनच्या प्रगतीचा आढावा, याची अचूक माहिती मिळणार आहे.जिल्ह्यातील १०१ महसुली मंडळांच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. तशी माहिती देणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर तेथे बसविण्यात आले आहे. हवामानाची माहिती देणारे टॉवर या ठिकाणी उभे करण्यात आले आहे. यातून हवामानाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे. सोबतच हवेतील आर्द्रतेची माहितीही शेतकºयांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात याला विभागण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक महसूल मंडळाची हवामानाची स्थिती काय असेल, याची माहिती या स्वयंचलित केंद्रातून मिळणार आहे. हवामानाच्या या ‘मायक्रो प्लानिंग’मुळे शेती विषयक कामाचे नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे.विशेष म्हणजे गाव पातळीवरचे पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे. पेरणीच्या कालखंडात पावसाचा अंदाज कसा आहे, मान्सूनची प्रगती होत आहे का, मान्सूनला पोषक वातावरण आहे का, पावसाचा वेग कसा असेल, या काळात उघडीप आहे का, याची अचूक माहिती शेतकºयांना उपलब्ध होणार आहे. तसेच अकाली येणाऱ्या संकटाची माहितीही आता गावपातळीवरच कळणार आहे.पिकांची कापणी करताना हवामान कसे असेल, हवेची दिशा काय असेल, माची मातिी मिळणार असल्याने श्ेतकऱ्यांना आठवडाभरात कुठली कामे पूर्ण करायची, याचे नियोजन करता येणार आहे. महसूल मंडळाचा हा अंदाज गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होईल. सोबतच अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी याबाबतही अंदाज येणार आहे.आता पावसाची शक्यता फोनवरचमहावेधच्या माध्यमातून पावसाचा अंदाज आणि इतर हवामानाची माहिती मिळणार आहे. पुढील काळात शेतकरी गट आणि गावांमध्ये स्मार्टफोनला त्याचा अहवाल जोडणे सहज सोपे होणार आहे. यामुळे शेती व्यवसायाला आधुनिकतेशी जोडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. या उपाययोजना प्रस्तावीत आहे. मात्र हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या पहिल्या टप्याची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरू होणार आहे.‘महावेध’च्या माध्यमातून जिल्ह्यातील १०१ मंडळांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.- नवनाथ कोळपकरकृषी अधीक्षक, यवतमाळ
१०१ महसूल मंडळात हवामानाचा अचूक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 9:45 PM
हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे.
ठळक मुद्दे‘महावेध’चे आधुनिकीकरण : ऊन, वारा, पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती आधीच मिळणार