लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : त्वरोगावरचा उपचार हा अतिशय महागडा आहे. याची औषधी महाग असल्याने गरीब रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी धजावत नाहीत. त्वचा रुग्णांसाठी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात येत नाही. अशा स्थितीत स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हेटिलीगो सोरायसीस’ आजार असणाऱ्यांवर फोटो थेरपी उपचार केला जाणार आहे.अनेकांना कोड, पांढरे डाग यासारखे त्वचा आजार असतात. हा आजार उपचारासाठी महागडा ठरत असल्याने ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शाप म्हणून तो अंगावर काढतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागातील रुग्णांना आता या आजारापासून सुटका मिळणार आहे. ज्या रुग्णांचा आजार नियंत्रणात आहे उदा. कोड किंवा पांढरे डाग हे वाढत नसल्याच्या अवस्थेत असेल तर फोटो थेरपीद्वारे त्याला पूर्णत: नियंत्रणात आणता येते. शिवाय ही थेअरी घेत असताना त्वचारुग्णाला कुठलेही औषध अथवा मलम लागणार नाही. त्याचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.शरीरावर कुठेही असलेला पांढरा डाग किंवा कोड या फोटो थेरपीद्वारे नियंत्रणात आणता येते. हा उपचार घेण्यासाठी ठराविक दिवस आठवड्यातून एक ते दोनवेळा नियमित काही तासांसाठी रुग्णालयात यावे लागते, असे त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. सुरजुसे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील त्वचा रुग्णांसाठी फोटो थेरपी उपचार पद्धती ही खºया अर्थाने संजीवनी ठरणारी आहे.
त्वचारोगावर फोटो थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 8:54 PM
त्वरोगावरचा उपचार हा अतिशय महागडा आहे. याची औषधी महाग असल्याने गरीब रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी धजावत नाहीत. त्वचा रुग्णांसाठी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात येत नाही.
ठळक मुद्देमेडिकलमध्ये उपचार : अद्ययावत तंत्रज्ञानाने औषधांपासून सुटका