लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचाराने नागरिक वैतागले आहे. तरीही नगरपरिषद कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप करीत बुधवारी ‘प्रहार’ संघटनेने चक्क मुख्याधिकाºयांच्या कक्षात डुकर सोडून रोष नोंदविला. येत्या १० दिवसात कारवाई न झाल्यास सर्व अधिकाºयांच्या घरात डुकरे सोडण्याचा इशारा संघटनेने दिला.नगरपरिषदेच्या हद्दीत डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे स्वाईन फ्लूचा उद्रेक होण्याचा धोका संघटनेने वर्तविला. मोकाट डुकरांनी शहरातील तीन ते चार जणांना चावा घेऊन जखमी केल्याचा आरोपही संघटनेने केला. या गंभीर प्रकारनंतरही नगरपरिषदेने डुकरांना आवर घातला नाही. संबधित मालकावर कारवाई केली नाही, असा आरोप संघटनेने केला.दोन महिन्यांपूर्वी डुकरे पकडण्याचे टेंडर काढण्यात आले. प्रत्यक्षात त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात डुकरांचा उदे्रक सुरू आहे. शहरात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यावर कारवाई करण्यासाठी प्रहारने आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र डुकरे न पकडल्याने बुधवारी मुख्याधिकारी डी. डी. ढेरे यांच्या कक्षात संघटनेने डुकर सोडून निषेध नोंदविला.यामुळे नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली. येत्या १० दिवसांत कारवाई न केल्यास अधिकाºयांच्या घरात डुकरे सोडण्याचा इशारा प्रहारने दिला. या आंदोलनात प्रहारचे उपजिल्हा प्रमुख संतोष दांडगे, सचिव चंदन हातागडे, शुभम तुरके, कमलेश गवई, सचिन इंगोले, शरद गायधने, बादल नाडे आदी सहभागी होते.
सीओंच्या कक्षात सोडले डुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 9:28 PM
शहरातील अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचाराने नागरिक वैतागले आहे. तरीही नगरपरिषद कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप करीत बुधवारी ‘प्रहार’ संघटनेने चक्क मुख्याधिकाºयांच्या कक्षात डुकर सोडून रोष नोंदविला.
ठळक मुद्दे‘प्रहार’चे आंदोलन : शहरात डुकरांचा हैदोस, पकडणार कोण ?