शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वाघाडी पॅटर्न राज्यासाठी पथदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:20 PM

जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणारे अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह उत्कृष्ट कार्य करणारे राज्य परिवहन महामंडळाचे वाहक गिता श्रीवास, रुख्मा मानवटकर, विठ्ठल माटे, चालक राजेंद्र मांडवे, अविनाश आंबेकर, तसेच स्वच्छ भारत मिशनचा पुरस्कार करणारे शिवचरण साहू, लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उज्वला आयुवेर्दाश्रमचे चंद्रकांत उके, जगदंबा कॉटन पार्कचे पवन बजाज, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्राविण्य मिळविणारा पुसद येथील पियुष डांगे, पहिल्या श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेली बहुरुपी समाजातील विद्याथीर्नी जया शिंदे, शिक्षिका शुभांगी आवारी यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे, डॉ. ललिता जतकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, वरीष्ठ अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMadan Yerawarमदन येरावार