लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेतील पाईप लाईनच्या ‘टेस्टिंग’दरम्यान गळव्हा गावातील शेतशिवारात पाईप फुटला. यामध्ये २५ एकरांमधील शेताची सुपीक माती वाहून गेली. संपूर्ण खडक उघडा पडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी जीवन प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यापुढे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शिवारात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही दिला.बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा शिवारात अमृत योजनेची पाईपलाईन फुटली. पाण्याच्या वेगाने २५ एकरातील मातीचा थर वाहून गेला. आता शेताला तलावाचे रूप आले. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या संपूर्ण बियाण्याचे नुकसान झाले. शेतशिवार दुरूस्त होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाच लाख रूपये मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. पाच शेतक ºयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. मात्र त्यांनी असमर्थता दर्शवित पुन्हा फोनच उचलले नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धाव घेतली. या शेतकºयांनी प्राधिकरणाला आता शेत शिवारात पाय ठेवू देणार नसल्याचे सांगितले आहे.यावेळी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशिराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव उकंडे, रमेश बडगुले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
-तर बेंबळावरून अमृत योजनेची पाईपलाईन टाकू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेतील पाईप लाईनच्या ‘टेस्टिंग’दरम्यान गळव्हा गावातील शेतशिवारात पाईप फुटला. यामध्ये २५ एकरांमधील शेताची सुपीक माती वाहून गेली. संपूर्ण खडक उघडा पडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी जीवन प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ...
ठळक मुद्देगळव्हाच्या शेतकऱ्यांचा इशारा : पाईपलाईन फुटल्याने नुकसान