लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शशीकांत सोनटक्के आदी उपस्थित होते.जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. या समितीची निवडणूक नुकतीच सवार्नुमते पार पडली. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासन, निवडून आलेले नवीन लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे प्रशासन या अत्याधुनिक सभागृहात निर्णय घेणार आहेत. २७ लाख ७२ हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची दिशा या सभागृहात ठरावी, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाचे उत्तम नियोजन व्हावे. जिल्ह्याच्या समस्या मोठ्या असून आणखी विकासाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. भविष्यात अनेक बाबींच्या चर्चा या सभागृहात होईल. जिल्ह्याच्या विकासाकरीता ही चर्चा उपयुक्त ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले.महसूल राज्यमंत्री राठोड म्हणाले, नियोजन विभाग जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. बांधकाम, नियोजन आणि महसूल विभागाने अतिशय सुंदर सभागृह उभे केले. जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर या सभागृहात चर्चा होऊन ते सोडविले जातील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.सभागृहाच्या बांधकामात महत्वाचे योगदान देणारे प्रवीण कुलकर्णी, प्रदीप तंबाके, एस.बी. ताकसांडे, नांदेड येथील कंत्राटदार कृष्णा एंटरप्रायझेस, इन्फोटकेचे राम संगम, कार्यकारी अभियंता सी.यू. मेहेत्रे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी केले. आभार मेहेत्रे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, संदीप महाजन, एनआयसीचे राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी आदी उपस्थित होते.
नियोजन समिती सभागृह लोकार्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:50 PM