शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कुष्ठरुग्णांना योजनांचा लाभ द्यावा

By admin | Published: August 01, 2016 12:50 AM

कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना

सचिंद्र प्रताप सिंह : कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा घेतला आढावा यवतमाळ : कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना विविध सामाजिक योजनांचा लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा शल्यचिकित्सक टी.जी.धोटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डी.डी.भगत आदी उपस्थित होते. औषधोपचारात खंड पडू नये व नियमित हा कार्यक्रम सुरु राहावा. नवीन रुग्ण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ९५२ इतके सक्रीय रुग्ण आहे. या रुग्णांच्या घरभेटी करून त्यांच्यावर नियमित उपचार करण्यासोबतच विविध सामाजिक योजनांचा लाभ त्यांना दिला जावा. या रुग्णांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास योजना, अंत्योदय योजना, बिपीएल कार्डचा लाभ देण्यासोबतच रुग्ण व रुग्णाच्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नाशिक येथे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणासाठी सुरुवातीस ५ हजार रुपये भरावे लागत असल्याने यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आजरग्रस्त व्यक्ती शेतकरी असल्यास बळीराजा चेतना अभियानातून ही रक्कम भरली जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)