घाटंजी : सामाजिक जाण असणाऱ्या येथील एका तरुणाने मित्र व नागरिकांच्या सहकार्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण केले.
भाविक भगत, असे या युवकाचे नाव आहे. निसर्गाचे संवर्धन व्हावे, आरोग्य हे सुदृढ राहावे, कोरोनासारखी जीवघेणी महामारी व अन्य आजार दिवसेंदिवस पसरत असून, यावर सर्वोत्तम उपचार म्हणून वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. या उद्दिष्टाने ‘एक मित्र, एक झाड’ हा उपक्रम त्यांनी राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील त्रिरत्न बुद्धविहार सभागृहाच्या परिसरात आणि शहराच्या परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. भाविक भगत यांच्या या उपक्रमाला महिलांनीही विशेष हातभार लावला. शोभा अलोने, ममता वेट्टी, माधुरी कोसुलकर, ताई बावणे, ताई धाबर्डे, प्रकाश वावरे, श्यामराव मुनेश्वर, अरुण अलोने, वाहतूक नियंत्रक भाऊ सिंगेवार, अंकुश ठाकरे, प्रशिल ढोके, सिद्धांत जीवने, प्रशांत कोसुलकर, अजय गजभिये, शंतनू वानखडे, स्वराज भगत आदींनी वृक्षारोपण केले.