लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुला-मुलींमध्ये भेद करण्याचा संकुचित विचार आता कालबाह्य होत आहे. कुटुंबात लोकशाही असेल तर देशातही लोकशाही नांदेल. स्त्री-पुुरुषांनी एकमेकांशी संवेदनशील होऊन माणूस म्हणून जगावे, असे प्रतिपादन डॉ. गीताली वि.मं. यांनी केले. येथे आयोजित ‘मजबूत माझा उंबरठा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार न.मा. जोशी होते. बाळासाहेब सरोदे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा परिषद सभापती नंदिनी दरणे, मंगला सरोदे, डॉ. आशा देशमुख आदींची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व दाखविणाऱ्या अंजली गवारे, योगीता आत्राम, नाजनीन खान, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.बाळासाहेब सरोदे अमृत महोत्सव समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रा. न.मा. जोशी यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेब सरोदे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा परिचय दिला. कार्यक्रमाचे संचालन मृणाल बिहाडे व अमित सरोदे यांनी केले. कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
एकमेकांशी माणूस म्हणून वागावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:07 PM
मुला-मुलींमध्ये भेद करण्याचा संकुचित विचार आता कालबाह्य होत आहे. कुटुंबात लोकशाही असेल तर देशातही लोकशाही नांदेल. स्त्री-पुुरुषांनी एकमेकांशी संवेदनशील होऊन माणूस म्हणून जगावे, असे प्रतिपादन डॉ. गीताली वि.मं. यांनी केले.
ठळक मुद्देगीताली वि.मं. : ‘मजबूत माझा उंबरठा’ कार्यक्रम