लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन काळातही जुगार अड्डे बहरलेले आहेत. पण हे जुगार अड्डे धोकादायक ठरत आहेत. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही बाब उघड झाली आहे. अमरावतीत अशाच एका जुगार अड्ड्यावरून राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर या जुगार अड्डा चालकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा कुठेही सर्रास मिळतो व चालतो. कारवाईची जबाबदारी असलेल्यांचाच त्याला आशीर्वाद असतो. जगभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. हजारो लोकांचा त्यात बळी गेला आहे. महाराष्ट्रातही बळींचा आकडा एक हजारांकडे पोहोचतो आहे. किमान लॉकडाऊन काळात जीवाच्या भीतीने हे अवैध धंदे बंद असावे अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात यातील अनेक अवैध धंदे सुरू आहेत. जुगार अड्डे-क्लबसुद्धा अनेक ठिकाणी बहरले आहेत. काहींनी शहराऐवजी ग्रामीण भागातील क्लबवर जाऊन खेळणे सुरू केले. परंतु हा जुगार जीवघेणा ठरू शकतो. अमरावती जिल्ह्यात अशाच एका जुगार क्लब चालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर त्याच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या एका राजकीय नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला. तेथे खेळायला येणाऱ्या इतरांनाही हा संसर्ग असण्याची भीती वर्तविली जात आहे. कधी काळी शासनाच्या तिजोरीतील ईनकमची छोटी चाबी सांभाळणारा हा दमदार नेता हादरला आहे. शहरापासून दूरवर त्यांच्यावर उपचार सुरू आहे.वास्तवावर घातले पांघरुणपोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याच्या भीतीने जुगार क्लबमधून संसर्ग झाल्याची बाब शहरात कुठेही रेकॉर्डवर घेतली गेलेली नाही. ती सर्वच स्तरावरून दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु अमरावतीमधील या घटनेने जुगार खेळणाऱ्या तमाम शौकिनांना धोक्याचा इशारा दिला आहे. जुगारासाठी वाटल्या जाणाऱ्या पत्त्यांना खेळणाºया अनेकांचे हात लागतात व त्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो, ही बाब स्पष्ट झाली आहे.जिल्ह्यातही राजकीय उठबसयवतमाळ जिल्ह्यातही शहर व ग्रामीण भागात अनेक जुगार क्लब सुरू आहेत. यातील काही क्लबवर राजकीय नेते-कार्यकर्त्यांची तासन्तास बैठक असते. पिसलेल्या पत्यांना त्यांचाही हात लागतो. त्यामुळे कोणत्याही जुगार अड्डा-क्लबवर खेळणाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो.संयम पाळल्यास धोका टळू शकतोशौकिनांनी जुगार अड्ड्यावर जाणे, किमान लॉकडाऊन काळात संयम राखणे जीविताच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. काहींनी क्लबवर खेळल्यास चर्चा होते म्हणून स्वत:च्या घरीच जुगाराचे दुकान मांडण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु तेथेही खेळणाऱ्या अनेकांची हात पत्त्यांना लागत असल्याने कोरोना संसगार्चा धोका कायम राहतो. कोरोनाच्या या महामारीत जुगार खेळणारेच नव्हे तर खर्रा, गुटखा खाणारे, गावठी-अवैध दारू पिणारे या सर्वांसाठीच जीव वाचवायचा असेल तर स्वयंशिस्त महत्वाची ठरणार आहे.