लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कुटुंबासह उदरनिवार्हासाठी बाहेरगावी गेलेल्या आदिवासी कुटुंबातील १४ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या प्रकरणात पोलीस व शासनाने अद्याप गंभीर दखल घेतली नाही. पीडित कुटुंबाप्रमाणेच आदिवासी समाजातील अनेक कुटुंब बाहेरगावी उदरनिर्वाहासाठी जातात. विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कुटुंब उदरनिवार्हासाठी भिवंडी जि.ठाणे येथे गेले असता ही घटना घडली. १४ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. बिरसा मुंडा ब्रिगेडच्या विद्यार्थी संघटनेने याबाबत निवेदन दिले. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ते मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.याप्रसंगी बिरसा मुंडा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारुती भस्मे, शाखाध्यक्ष गजानन टारफे, दत्ताची रंगे, केशव कुरकुटे, गीता कुरकुटे, किरण किरोळे, गजानन काळे, सूरज बुरकुले आदी उपस्थित होते.
बलात्काराची सीआयडी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 10:06 PM
कुटुंबासह उदरनिवार्हासाठी बाहेरगावी गेलेल्या आदिवासी कुटुंबातील १४ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : बिरसा मुंडा ब्रिगेडचे पुसद एसडीओंना निवेदन