शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पतीनेच रचला पूजाच्या खुनाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात १६ नोव्हेंबर रोजी पूजा कावळे या २८ वर्षीय महिलेचा मृतदेह ...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात १६ नोव्हेंबर रोजी पूजा कावळे या २८ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलीस तपासात पूजाचा खून झाल्याचे पुढे आले होते. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, फरार एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, पत्नी पूजाच्या खुनाचा कट पती अनिल कावळे यानेच रचल्याचे निष्पन्न झाले आहे. दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील २८ वर्षीय पूजा अनिल कावळे ही वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ येथे राहत होती. १० नोव्हेंबर रोजी पुण्याला जाण्यासाठी ती घरून निघाली. मात्र त्यानंतर तिचा पत्ता लागला नाही. याप्रकरणी भोजराज पंजाबराव वानखेडे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची नोंद घेण्यात आली होती. दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविली असता हा मृतदेह बेपत्ता असलेल्या पूजा अनिल कावळे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिग्रस पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिग्रस पोलीस ठाणेस्तरावर एक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथकांसह सायबर सेल अशी चार पथके गठित करून पूजाच्या खुनाचा तपास  सुरू केला. मागील चार दिवसांपासून या प्रकरणाचा पोलीस पथकांकडून कसून तपास केला जात होता. अखेर गोपनीय माहितीवरून या  गुन्ह्याची उकल होत गेली. पोलिसांनी उज्ज्वल पंढरी नगराळे (२२, रा. राळेगाव), गौरव रामभाऊ राऊत (२१, रा. कळंब) आणि अभिषेक बबन म्हात्रे (२४, रा. शिंदी बु., ता. अचलपूर, जि. अमरावती) या तिघांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले. या आरोपींची कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा दुसरा-तिसरा कोणी नसून मृत पूजाचा पती अनिल रमेश कावळे हाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तिघांवरही पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

खुनी शोधण्याचे पोलिसांपुढे होते आव्हान- वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ येथून १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यासाठी निघालेली पूजा कावळे बेपत्ता होती. दिग्रस तालुक्यातील सावंगा शिवारात १६ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार संशयास्पद होता. घटनास्थळी कोणताही ठोस असा भौतिक पुरावा नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे होते. मात्र समांतर तपास आणि प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीची तांत्रिक निकषावर तपासणी करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. खुनाच्या गुन्ह्यात पतीच मास्टर माईंड निघाल्याने खळबळ उडाली. 

अधीक्षकांकडून पोलीस पथकाला २५ हजारांचे बक्षीस - पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. के. ए. धरणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकामधील यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, दिग्रसचे सपोनि विजय रत्नपारखी, विवेक देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल पुरी, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, यशवंत माळोदे, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, कुणाल रुढे, अजय निंबोळकर आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केल्याचे सांगत अवघ्या १२ तासात चार आरोपी निष्पन्न झाल्याने या पथकाला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी