पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त
By सुरेंद्र राऊत | Published: September 17, 2022 03:26 PM2022-09-17T15:26:03+5:302022-09-17T15:29:34+5:30
सुशिक्षित बेरोजगारांचे अभिनव आंदोलन
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसतर्फे महाबेरोजगारी दिनानिमित्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तळून, चहा वाटप करून केले अभिनव आंदोलन केले.
महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी देणारे उद्योगधंदे पळवून लावणा? या या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धरणे देत सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आंदोलन केले. हे आंदोलन यवतमाळ विधानसभा युवक अध्यक्ष विक्की राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
विदयार्थी काँगेस एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, पंचायतीराज संघटन जिल्हाध्यक्ष आशिष महल्ले, सुरज राजूरकर,राहुल वानखेडे, पंडित कांबळे, लालाजी तेलगोटे, सनी आगळे,आकाश जयस्वाल, आशिष किनकर, बाबू खडसे, शुभम भांडवले, सुरज मेश्राम, नितीन राऊत, दीपक सोनेरी, अतुल तोडसाम, सुरज कनोदे, अक्षय तिडके, योगेश तूपसुन्द्रे, दत्ता घोसाळकर, देवानंद इंगळे, अजय इंगळे, सुरज राजूरकर, दिलीप अग्रवाल, सुनील इंगळे, अंकुश इंगोले, दीपक इंगोले, रोशन मेश्राम उपस्थित होते.