शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 10:51 PM

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : दाभडी, पांढरकवडा पाठोपाठ औरंगाबादमध्येही खोटी आश्वासने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या गोरगरीब लाखो महिलांची कर्ज व निधीचे आमिष दाखवून दिशाभूल करीत आहेत. याच महिलांचा मग प्रचारातील गर्दी वाढविण्यासाठी वापर केला जातो. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी याच महिलांचा आधार घेऊन प्रचारसभा यशस्वी केली गेली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.अ‍ॅड. मोघे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेतसुद्धा बचत गटाच्या महिलांना पुन्हा कर्ज, निधी यासारखी आश्वासने दिली गेली. त्यावरून सहा महिने लोटले. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आता दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येसुद्धा मोदींनी पुन्हा बचत गटाच्या महिलांपुढे एक लाखापर्यंत कर्ज, जनधन खात्यात पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट आदी आश्वासने दिली. औरंगाबादमधील या मेळाव्यातून तर मोदींच्या फसव्या आश्वासनांची जणू पोलखोल झाली आहे. त्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. उलट या आश्वासनांच्या बळावर सदर महिलांच्या गर्दीचा आपल्या सभा यशस्वी करण्यासाठी व गर्दी जमविण्यासाठी उपयोग केल्याचा आरोप मोघे यांनी केला आहे.खोट्या आश्वासनांसाठी दाभडी-पांढरकवडाचा वापरमोदी यांनी खोट्या प्रचार व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसाठी कायम यवतमाळ जिल्ह्यातील आणि विशेषत: आर्णी विधानसभा मतदारसंघातील भूमीचा वापर केला आहे. मोदींनी बचत गटाच्या महिलांचीच नव्हे तर देशातील तमाम जनतेचीसुद्धा प्रत्येकाच्या बँक खात्यता १५ लाख रुपये जमा करू, हे आश्वासन देऊन व त्याची पूर्तता न करून दिशाभूल केली आहे. बचत गटाच्या महिलांची दिशाभूल करून भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. आर्णी मतदारसंघातसुद्धा याच बळावर भाजपला ५८ हजार मतांची लोकसभेत आघाडी मिळाली.भाजप आमदारांना फटकाआता बचत गटाच्या महिलांचा मोदींच्या फसव्या आश्वासनामुळे गैरसमज दूर झाला असून विधानसभा निवडणुकीत बचत गटाच्या महिला मोदींच्या या फसव्या आश्वासनांना थारा देणार नाही, भाजपची ही पैशाची जादू आता चालणार नाही, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. मोदींच्या या फसव्या आश्वासनांचा आगामी विधाससभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना गावागावात मोठा फटका बसण्याची शक्यताही अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी