लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली.कपील अरुणराव गजभिये (२७) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे या तस्कराचे नाव आहे. त्याने एम.एच.३१-सीबी-९८६१ क्रमांकाची ट्रॅव्हल्स दारूसाठी वापरत होता. रॉयल स्लिपर कोच नावाने ही ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करीत होती. काही दिवसापूर्वी शहर पोलिसांनीसुद्धा याच ट्रॅव्हल्ससह दारू घेऊन जाताना पांढरकवडा बायपासवर कपिल गजभिये याला ताब्यात घेतले होते. विशेष पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून मंगळवारी रात्री भोसा बायपासवर कारवाई केली. यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत पोत्यात भरलेल्या देशी दारूच्या चार हजार ८०० बॉटल्स् मिळून आल्या.या ट्रॅव्हल्सचा चालक शिवाजी दिनकर देवकते (३८) रा. चिखली ह.मु. जामनकरनगर हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तस्कर आता थेट ट्रॅव्हल्स सारख्या वाहनाचा वापर करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे प्रमुख प्रदीप सिरस्कर, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख जमादार सय्यद साजीद, अजय डोळे, अजय ढोले, वासू साठवणे, योगेश डगवार, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे यांनी केली.
वर्धेला दारू घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:50 PM
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली.
ठळक मुद्देसव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त : एसपींच्या विशेष पथकाची कारवाई