लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस ठाणे व पोलीस वसाहतींची अवस्था बकाल झाली आहे. अनेक इमारतींनी शतक पूर्ण केले आहे. त्यानंतरही पोलिसांचा कारभार येथेच सुरू आहे. झोपडी वजा शासकीय वसाहतींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा शोधावा लागतो. आता पोलीस वसाहतीकरिता पोलीस हाउसिंग या स्वतंत्र विभागाची राज्य पोलीस महासंचालकांच्या स्तरावर स्थापना झाली आहे. येथे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांच्या इमारतींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवाय पोलीस मुख्यालयाचाही कायापालट करणारा जम्बो प्लॅन मुंबईला पाठविला आहे.पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे. शिस्तीचे खाते म्हणून सर्वाधिक अन्याय पोलिसांना सहन करावा लागतो. संघटन नसल्याने वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याची सोय नाही. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वैयक्तीस्तरावर पाठपूरावा सुरू केला. शक्य तितका निधी जिल्हा नियोजन समितीतून मिळवला. याकरित पालकमंत्री मदन येरावार यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे.जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाणे व वसाहत बांधकामाचा कार्यादेश आला आहे. पोलीस हाउसिंगच्या निधीतून ही इमारत होत आहे. याच पद्धतीने वणी, दिग्रस व यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या इमारती व वसाहतीचा प्रस्ताव आहे. शिवाय जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात जवळपास २५३ क्वॉर्टर प्रस्तावित आहे. पळसवाडी कॅम्प पोलीस वसाहतीत ८६ क्वॉर्टर आहे.रस्त्यावर दुकान गाळे, आत पोलीस ठाणेयवतमाळ शहरात पोलीस ठाण्याच्या जागेची व्यावसायिक उपयोगीता पाहता येथे कमर्शिअल इमारत प्रस्तावित आहे. दोन प्रमुख रस्त्यांवर दुकान गाळे काढणार आहे. तर मध्यवर्ती भागात पोलीस ठाणे व उर्वरित जागेत क्वॉर्टर राहणार आहेत. या प्रोजेक्टला १० कोटींचा खर्च अपेक्षित असून पाच कोटी जिल्हा नियोजन समितीकडून तर पाच कोटी पोलीस हाउसिंगकडे मागण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणखी पाच कोटींच्या इमारतीचा प्रस्ताव आहे. जिल्हा नियोजन समितीतून नेर, घाटंजी व पोलीस मुख्यालयातील क्वॉर्टरसाठी चार कोटी ९९ लाखांची तरतूद नियोजन समितीकडून केली जाणार आहे. यातील त्रृटींची पूर्तता केल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळणार आहे.
पोलीस वसाहत, ठाण्यांसाठी जम्बो प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:33 PM
जिल्ह्यातील पोलीस ठाणे व पोलीस वसाहतींची अवस्था बकाल झाली आहे. अनेक इमारतींनी शतक पूर्ण केले आहे. त्यानंतरही पोलिसांचा कारभार येथेच सुरू आहे. झोपडी वजा शासकीय वसाहतींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा शोधावा लागतो.
ठळक मुद्देमुख्यालयाचा होणार कायापालट : यवतमाळ शहर ठाण्याच्या जागेवर व्यापारी संकुल