लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील सात-आठ महिन्यांपासून आपण कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहो. शासन, प्रशासन, आरोग्य, पोलीस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पोलीस विभाग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलीस ह्यफ्रंटलाईन वॉरिअर्सह्ण आहेत, असे गौरवोद्वागार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, लोकमत यवतमाळ जिल्हा कायार्लय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.सध्या काही प्रमाणात कोरोनापासून दिलासा मिळाला असला तरी दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांमध्ये गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. पोलीस विभागाला शासन किंवा प्रशासनाकडून सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.पोलिसांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फीत कापून कोविड केअर सेंटर फॉर पोलीस रुग्णालयाचे पालकमंत्र्यांनी लोकार्पण केले. यावेळी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा धुर्वे उपस्थित होत्या. संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक देवानंद लोणारे, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे, राखीव पोलीस निरीक्षक दुबे आदी उपस्थित होते.३० खाटांचे रुग्णालयपोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील म्हणाले, ह्यकोरोनाविरुध्द युध्द आमचे सुरूह्ण या संकल्पनेतून हे ३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच अधिकारी आणि १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रस्त्यावर उतरून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. वऱ्हाड प्रांतातील जुनी इमारत या रुग्णालयासाठी उपयोगात आणली आहे, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कोरोना लढाईत पोलीस फ्रंटलाईन वॉरिअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:00 AM
येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, लोकमत यवतमाळ जिल्हा कायार्लय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देसंजय राठोड : पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता कोविड केअर सेंटरचे पोलीस मुख्यालयात लोकार्पण