यवतमाळ: येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यात प्राध्यापकाने संस्थेचे सचिव व प्राचार्यावर गंभीर आराेप केले. हा व्हिडीओ व्हायरल हाेताच ग्रामीण पाेलिसांचे पथक महाविद्यालयात पाेहाेचले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाचा जबाब नाेंदवला असून पुढील चाैकशी सुरू आहे.सहाय्यक प्राध्यापक माे. वसीम अब्दुल कादर हे केमेस्ट्री हा विषय शिकवितात. त्यांनी शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वी संस्थेचे सचिव शीतल वातिले व प्राचार्य यांच्याकडून मानसिक छळ केला जाताे, वेतन वेळेवर दिले जात नाही, काेणतेही कारण नसताना कारणे दाखवा नाेटीस बजावून उलट-सुलट विचारपूस केली जाते, असे आराेप व्हायरल केलेल्या व्हिडीओतून केले.
VIDEO: मानसिक छळ होत असल्यानं आत्महत्या करतोय! 'त्या' व्हिडीओची पोलीस चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 3:09 PM