अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल १५ दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद करून अडविण्यात आले. परिणामी पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे गांजेगाव बंधाºयाचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी बंधाऱ्याखालील गावकऱ्यांनी केली होती. बुधवारी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात हे गेट काढले. यामुळे मराठवाडा हद्दीतील गेटवरील आणि गेटखालील गावकºयांत हाणामारी झाली. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला. आंदोलनानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र १२ दलघमी पाणी सोडून १५ दिवस लोटल्यानंतरही पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. गांजेगाव बंधाऱ्यांच्यावरील गावच्या शेतकऱ्यांनी गेट बंद करून पाणी अडविले. त्यांनी गेट काढण्यास नकार दिला. एकत्रित आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येच पाणी मिळविण्यासाठी वाद झाला.अखेर बुधवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महसूल, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गेट काढले. त्यामुळे पाण्याच्या कारणावरून तू पोलिसांचा मार खाऊन आलास, असे मस्करीत म्हटल्यावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.ढाणकी-पळसपूर परिसरात तणावया घटनेने ढाणमी, पळसपूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बंधाऱ्यावरील गावातील साईनाथ जाधव यांच्या तक्रारीवरून सहा आणि आणि बंधाºया खालील गावातील मदनराव जाधव यांच्या तक्रारीवरून पाच, अशा ११ जणांविरूद्ध दिहमायतनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पाण्याचा वाद आता चांगलाच पेटला असून १५ दिवसांच्या परिश्रमाने मिळविलेल्या पाण्यावरून शेतकºयांमध्येच मारामारी होऊ लागली आहे.
पोलीस बंदोबस्तात गांजेगाव बंधाऱ्याचे गेट काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 9:37 PM
इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये हाणामारी : उमरखेड तालुक्यात इसापूर धरणाचे पाणी पेटले, हिमायत नगरात गुन्हे दाखल