आर्णी ( यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय माहामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री १: ३० गस्तीवर असताना, कोसदनी घाटाजवळ एका आयशर ट्रकने माहामार्ग पोलिसाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात पोलिस शिपाई संजय रंगराव नेटके (४१)व ट्रक चालकपांढूरंग हरी नकाते (५०) यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकने दिलेलया धडकेत २ पोलिसांचा मृत्यू झाला असून इतर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.