शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

यवतमाळ पालिकेत राजकीय समझोता

By admin | Published: May 27, 2017 12:12 AM

येथील नगरपरिषदेत भाजपविरूद्ध शिवसेना, असा संघर्ष पेटला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत

स्थायी समिती : अर्ध्या तासात ७० विषय मार्गी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपविरूद्ध शिवसेना, असा संघर्ष पेटला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत मात्र सर्वंच विषय एकमताने मंजूर झाले. यामुळे आता नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सभेत मागे दोनदा तहकूब झालेल्या सभेतील विषय तसेच नवीन विषय, अशा ७० विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. काही मिनिटांत हे विषय मंजूर झाले. त्यामुळे उशीरा का होईना, नगरसेवकांना विकास कामांची उपरती झाल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या बैठकीत शहरातील अंतर्गत रस्ते आणि सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम, नेताजीनगरासाठी सार्वजनिक शौचालय बांधकामाचा मुद्दा चर्चेला आला. नंतर येथील रेल्वेच्या जागेत शौचालय बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या एका आदेशाचा आधार घेण्यात आला. बैठकीत शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे टॅँकर लावण्याचा ठराव पारित झाला. विंधन विहिरींवर सबमर्शीबल पंप बसवून नळावरून पाणी वितरित करण्यालाही मंजुरी दिली. बीओटी तत्वावर एलईडी लाईट बसविण्याला मान्यता दिली. दलितवस्ती सुधार योजनेतील तलावफैल, चमेडीयानगर, मिलींद सोसायटी, नेताजीनगर शाळेला संरक्षक भिंत, सुराणा ले आऊट, रविदासनगर, अंबिकानगर, मलन्नानगर, विटभट्टी परिसर, सेवानगर येथील विविध विकास कामांनाही सभेने एकमताने मंजुरी दिली.