शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

सभापती निवडीत राजकीय उलथापालथ

By admin | Published: March 31, 2017 2:16 AM

जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती केवळ बांधकाम सभापती पदावरून फिस्कटल्याने शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले.

जिल्हा परिषद : शिवसेनेची नजर बांधकाम समितीवर यवतमाळ : जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती केवळ बांधकाम सभापती पदावरून फिस्कटल्याने शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. याचा वचपा काढण्याची संधी शिवसेना शोधत असून असंतुष्टांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सभापती निवड प्रक्रियेत ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करून नियोजित सदस्याला सभापती पदापासून दूर ठेवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष अशी ४१ सदस्यांची आघाडी करण्यात आली. हा सर्व खटाटोप केवळ राष्ट्रवादीच्या गटनेत्याला बांधकाम सभापती पद मिळावे म्हणून झाला. त्यामुळे शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले, तर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना शेवटच्या क्षणी आपला शब्द फिरवावा लागला. याचा हिशेब चुकता करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपासोडून इतर पक्षातील कोणत्याही इच्छुकाला सभापती पदासाठी समर्थन देण्याचा मनसुबा शिवसेनेने आखला आहे. सभापतीपदी निवडून येण्यासाठी ३१ चे संख्याबळ जुळविणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे काँग्रेस, भाजपाच्या काही सदस्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी कॅश करून राष्ट्रवादीच्या उर्वरित सदस्याचे समर्थन मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत उलथापालथ करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पांढरकवड्यातील युवा शिलेदारावर विशेष जबाबदारी सोपविली आहे.खुद्द एका सेना नेत्याने वणीतील भाजपाच्या एका असंतुष्ट सदस्याला आॅफर दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेने सध्या वणी आणि मारेगाववर लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे प्रतिसाद मिळाल्यास पुसदमधून पुन्हा दहाची कुमक मिळण्याची आशा शिवसेनेला आहे. त्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. शक्य होईल ते सर्व प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. त्याकरिता जोडतोड करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. ही खेळी कितपत यशस्वी होईल, हे सोमवारी होणाऱ्या सभापती निवड प्रक्रियेतूनच सिद्ध होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)