लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे शहरालगतच्या नागापूर (रु) येथील पांडुरंग ससाने यांचा संसार मोडून पडला होता. अखेर ससाने कुटुंबियांच्या मदतीसाठी रोटरी क्लबने धाव घेतली. संपूर्ण मदत करून सामाजिक बांधिलकी जपत हा संसार पुन्हा उभा केला.प्रतिकुल परिस्थितीत काबाड कष्ट करून ससाने कुटुंब उभे राहिले होते. मात्र अचानक झालेल्या स्फोटाने त्यांचे होते नव्हते साहित्य उद्ध्वस्त झाले. समाजातील लोकांनी जमेल तशी मदत या कुटुंबियांना केली. टीनपत्रे, राशन दिले. तर रोटरी क्लबने घरात लागणारे संपूर्ण भांडे व संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा मोडका संसार पुन्हा उभा करण्यासाठी हातभार लावला. शासन स्तरावरून मिळालेली मदत अत्यंत तोकडी होती. त्यामुळे समाजातील संवेदनशील नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले. आम्हा ससाने कुटुंबियांसाठी ही मदत अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया या परिवाराने व्यक्त केली. ससाने कुटुंबियांना मदत देताना रोटरी क्लब उमरखेडचे अध्यक्ष दत्तात्रय दुर्केवार, सचिव श्रीराम सारडा, बाळासाहेब सरसमकर, चेतन माहेश्वरी, गजानन अनखुळे, धनंजय व्यवहारे, महेश आहेर, सुदर्शन नरवाडे, दिनेश तेला, पांडुरंग कलाणे आदी उपस्थित होते. या मदतीमुळे ससाने कुटुंबियांना मोठा हातभार मिळाला आहे. शिवाय समाज आपल्या सोबत असल्याचा मोठा मानसिक दिलासा मिळाला.
निराधार कुटुंबाला समाजाचा मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:06 AM
प्रतिकुल परिस्थितीत काबाड कष्ट करून ससाने कुटुंब उभे राहिले होते. मात्र अचानक झालेल्या स्फोटाने त्यांचे होते नव्हते साहित्य उद्ध्वस्त झाले. समाजातील लोकांनी जमेल तशी मदत या कुटुंबियांना केली.
ठळक मुद्देरोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी : गॅस सिलिंडर स्फोटाने उद्ध्वस्त झाले होते ससाने कुटुंब