शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:24 AM

शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.

ठळक मुद्देपाईप पोहोचलेच नाही : कामासाठी लागणार १५ दिवसांचा अवधी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीच्या पाण्यासाठी यवतमाळकरांना मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीही लवकरच मिळण्याची आशा नाही. त्यामुळे गोखी प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज हाती घेण्यात आले. यवतमाळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावरील गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळच्या एमआयडीसीत येते. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. औद्योगिक वसाहत ते दर्डानगर हे ४.२० किमी अंतर आहे. आता औद्योगिक वसाहत ते लोहारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत गोखी प्रकल्पाचे पाणी आणले जाईल. तेथून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत २००७ मध्ये टाकण्यात आलेल्या २०० एमएम पीव्हीसी पाईपने पाणी आणले जाईल.औद्योगिक वसाहतीपासून लोहाराच्या टाकीपर्यंत पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील मुख्य चौकापर्यंत खोदकामही झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत पाईपच आले नाही. त्यामुळे या पाईपची सर्वांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सदर पाईप शनिवारी यवतमाळात पोहोचणार होते. परंतु सोमवारपर्यंत पाईप आले नव्हते. पाईप आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी १५ दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीचे पाणी मिळण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.अतिरिक्त पाणी सममध्ये जाणारगोखी प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीत पोहोचल्यानंतर दर्डानगर, वडगाव, लोहारा, सुयोगनगरातील सुमारे ८० हजार लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचणार आहे. ज्या दिवशी गोखी प्रकल्पातून अधिक पाणी खेचले जाईल. ते पाणी जीवन प्राधिकरणाच्या सममध्ये सोडले जाईल आणि तेथून ते शहरातील इतर भागांना वितरित केले जाणार आहे.दररोज मिळणार २० लाख लिटर पाणीगोखी प्रकल्पातून दररोज २ एमएल म्हणजे २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक वसाहतीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोखी प्रकल्पाचा मृतसाठा हा निळोणा प्रकल्पाच्या संपूर्ण साठ्याएवढा आहे. गोखी प्रकल्पात १.५ दलघमी जीवंत साठा आणि ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. जीवंत साठा संपला तरी सहा महिने पुरेल एवढा मृतसाठा या प्रकल्पात आहे.