शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’; 42 जणांना सुट्टी, 55 नव्याने पॉझेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 7:42 PM

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 55 जणांमध्ये 34 पुरुष आणि 21 महिला आहेत.

यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 42 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 55 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज (दि. 22) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 55 जणांमध्ये 34 पुरुष आणि 21 महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष, पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चौक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जाम बाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महिला व एक पुरुष, झरी शहरातील मुकुटबन येथील आरसीसीपीसी कंपनीतील चार पुरुष, मानोरा ग्रामीण पांचाळा येथील एक महिला आणि दारव्हा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 613 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 195 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2577 झाली आहे. यापैकी 1706 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 63 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 150 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 40852 नमुने पाठविले असून यापैकी 39994 प्राप्त तर 858 अप्राप्त आहेत. तसेच 37417 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ