शहरं
Join us  
Trending Stories
1
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
3
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
4
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
5
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
6
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
7
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
8
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
9
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
10
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
11
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
12
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
13
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
14
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
15
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
16
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
17
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
18
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
19
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
20
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

By admin | Published: November 20, 2015 2:53 AM

नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे.

बैठक निष्फळ : दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय कळंबमध्ये सत्ताप्राप्ती नाहीकळंब : नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे. नगरपंचायतमध्ये शिवसेना पाच तर भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांनी एकत्र आल्यासच युतीचा झेंडा फडकल्या जाऊ शकते. परंतु हे दोन्ही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे नुकतीच झालेली जिल्हा पातळीवरील बोलणीही निष्फळ ठरल्याचेच दिसून येते.आतापर्यंतच्या ग्रामपंचायत प्रशासनावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. केवळ मागील पंचवार्षीक ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना डावलून जनतेने नव्या दमाच्या युवकांवर विश्वास टाकला. त्यामुळे कळंब नगर पंचायतमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन करावी, असा जनतेचा कौल आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या हेकेखोर वृत्तीमुळे युती संदर्भात एका ठराविक निष्कर्षावर चर्चा पोहचलेली नाही. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी नेत्यांमध्ये युतीच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत डॉ.अशोक उईके यांनी एक अपक्षासह आपले पाच नगरसेवक असल्याची बाजू मांडली. नगराध्यक्ष व केवळ एक विषय समिती सभापतीचे पद ठेऊन उपनगराध्यक्षांसह सर्व पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्मुला ठेवण्यात आला. परंतु शिवसेनेने हा फॉर्मुला तत्काळ रिजेक्ट केला. नगराध्यक्ष होईल तर शिवसेनेचाच हा पवित्रा घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत कळंब नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच, अशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती. एवढेच नाही तर सलग पाच वर्ष सेनेचाच नगराध्यक्ष राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची २७ तारीख आली असतानाही युतीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कळंबवासी अजुनही शेवटच्या क्षणी कोणाची युती होईल या संभ्रमात आहे. शैलजा प्रकाश उमरतकर या एकमेव नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आल्या. काँग्रेस, शिवसेना व भाजपानेही त्यांच्यावर दावा ठोकला आहे. परंतु त्यांनी आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. आपण कोण्या एका पक्षासोबत नसून कुठलेही दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविणाऱ्यांसोबत आहो. त्यामुळे आपल्याला कोणीही गृहित धरु नये, असे रोखठोक मत त्यांनी लोकमतशी बोलताना मांडले. (तालुका प्रतिनिधी)