शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसचा मुंबईत खल

By admin | Published: March 26, 2016 2:11 AM

अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता मुंबईत खल सुरू झाला असून एप्रिल महिन्यात ...

एप्रिलमध्ये घोषणा : प्रदेशाध्यक्षांनी घेतल्या मुलाखतीयवतमाळ : अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता मुंबईत खल सुरू झाला असून एप्रिल महिन्यात नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. २१ मार्च रोजी मुंबईच्या गांधी भवनात जिल्ह्यातील तब्बल १७ इच्छुकांनी मुलाखती दिल्यात यात माजी मंत्री, माजी आमदारांसह पक्षासाठी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सदस्यांचाही समावेश आहे. या उपरही पक्षश्रेष्ठींचा शोध संपला नसून मार्चअखेरपर्यंत इच्छुकांना संधी दिली जाणार आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; त्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंतराव पुरके, माजी मंत्री संजय देशमुख, विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, नंदिनी पारवेकर, विजयाताई धोटे यांच्यासह १७ जणांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी प्रत्येकांशी १० ते १५ मिनिट पक्षबांधणी या विषयावर चर्चा केली. जिल्ह्यातील पक्षस्थितीबाबत इच्छुकांना विचारण्यात आले. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना हव्या आहेत, यापूर्वी कोणत्या चुका झाल्या अशी विचारणा प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.समोरासमोर आरोप-प्रत्यारोप म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र बोलवून स्थिती जाणून घेतली. प्रत्येक इच्छुकाने पक्षाने दिलेली जबाबदारी आपण स्वीकारण्यास आपण कसे सक्षम आहो, हे ठासून सांगितले. अध्यक्ष निवडण्यासाठी कोणाला मत मांडायचे असल्यास मार्चअखेरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आले.नागपूर येथे ११ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाबाबतही जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान सातत्याने नागपूर दौरा होत राहणार आहे. याच काळात इतरही ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस जिल्हाध्यक्षाची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे मुलाखतीस गेलेल्या इच्छुकांनी सांगितले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)