किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कृषी पंपासाठी वीज जोडणीला नकार देत सौर ऊर्जा मोटरची सक्ती विद्युत कंपनीकडून केली जात आहे. सौर ऊर्जा मोटरने पूर्ण क्षमतेने सिंचन शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी यासाठी नकार दिला आहे. मात्र वीज नसल्यामुळे त्यांच्यापुढे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे कृषी पंपाच्या जोडणीसाठी अर्ज दाखल केलेले आहे. काही शेतकºयांना आवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जोडण्या देण्यात आल्या. आता मात्र कंपनीने सौर ऊर्जा मोटरचा तगादा लावला आहे. वीज जोडणी मिळणारच नाही, सौर ऊर्जा मोटरच घ्यावी लागेल, अशी भूमिका घेतली आहे.सौर ऊर्जा मोटरने केवळ जास्तीत जास्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरचेच पाणी ओढले जाऊ शकते. त्यापेक्षा अधिक दूरवरून पाणी ओढणे शक्य होत नाही. तरीही सौर ऊर्जेची सक्ती केली जात आहे. तालुक्याच्या कोव्हळा परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी कोव्हळा धरणाचे पाणी मिळणार आहे. बºयाच शेतकºयांच्या शेतापासून या धरणाचे अंतर दोन किलोमीटरपेक्षा अधिक दूर आहे. सौर ऊर्जा मोटरद्वारे या धरणावरून शेतात पाणी आणणे कठीण आहे. या शेतकºयांचा सिंचनातून समृद्धीचा मार्ग अडथळ्याचा ठरत आहे. विद्युत कंपनीने वेठीस धरू नये, अशी अपेक्षा या शेतकºयांना आहे. मोटारपंपासाठी वीज मीटर तत्काळ द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.बारमाही पिके घेण्याच्या स्वप्नांवर पाणीकोव्हळा धरणाचे पाणी मिळावे यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून खूप प्रयत्न झाले. या प्रकल्पाचे पाणी मिळाल्यास बारमाही पिके घेता येईल, असे स्वप्न त्यांनी रंगविले होते. सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र मोटारपंपाचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
विद्युत कंपनीचा जोर सौर ऊर्जा मोटरपंपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 9:38 PM
कृषी पंपासाठी वीज जोडणीला नकार देत सौर ऊर्जा मोटरची सक्ती विद्युत कंपनीकडून केली जात आहे. सौर ऊर्जा मोटरने पूर्ण क्षमतेने सिंचन शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी यासाठी नकार दिला आहे. मात्र वीज नसल्यामुळे त्यांच्यापुढे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देसिंचनातील अडचणी : नेर तालुक्यात शेतकऱ्यांना केली जात आहे सक्ती