लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.तालुक्यातील अंजनखेड, लोणबेहळ येथे विकास कामांचे लोकार्पण करताना ते बोलत होते. अंजनखेड येथे राजीव गांधी भवन झाल्याने आता एकाच छताखाली सर्व कार्यालय आले. यामुळे विकास कामे त्वरित मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले. नवीन वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची असल्याचे माजीमंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अॅड.प्रदीप वानखडे, जितेंद्र मोघे, साजिद बेग, अविनाश गावंडे, महेश कंचलवार, माजी सरपंच यादवराव वानखडे, विठ्ठलराव बंडे, सरपंच माया लसंते, उपसरपंच रत्नमाला गेडाम, सुनील भारती, ऊद्धवराव भालेराव, बाळासाहेब गिरी, छोटू देशमुख, नितीन बुटले, अतुल देशमुख, दिनेश ठाकरे, संजय पवार, के.बी.भेंडे, स्नेहल पाटील, डॉ. शाम शिंदे, निरंजन जाधव आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत यांनी केले.
लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:26 PM
लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.
ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : लोणबेहळ, अंजनखेड येथे आवाहन