शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

चिमुकल्या परीमागे आई धावली अन् झाला स्फोट, सासूसमोरच सून-नातीचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 11:34 AM

आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला.

ठळक मुद्देआयता येथील ह्रदयद्रावक घटना

हरिओम बघेल/सुकुमार पवार

आर्णी/सावळी सदोबा (यवतमाळ) : बुधवारी सकाळी काजल स्वयंपाकासाठी गॅस पेटवीत होती. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला. त्या भडक्यामुळे काजल व परीसह सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (वय ६०) घराबाहेर धावल्या. दरम्यान, चिमुकली परी पुन्हा घरात खेळणे आणण्यासाठी शिरली. तिच्या वाचविण्यासाठी सात महिन्यांची गर्भवती असलेली काजलही तिच्या मागोमाग घरात शिरली. नेमका त्याच वेळी घरातील दोन्ही सिलिंडरचा स्फोट होवून मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले. बुधवारी गावात एकही चूल पेटली नाही.

काजल विनोद जयस्वाल (३०) आणि परी विनोद जयस्वाल (४), अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकीची नावे आहेत. या स्फोटामुळे क्षणार्धात संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. काजल आणि परी या दोघींनाही घराबाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. आगीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने प्रतिमा जयस्वाल बचावल्या.

आग लागल्यानंतर तातडीने गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी आपल्या घरातून पाणी भरलेले हंडे, बादली आदी साहित्य आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आर्णी प्रशासनाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलालाही कळविण्यात आले. आगीचे रौद्ररूप बघून गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांनंतर त्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत काजल आणि परीचा जळाल्याने करुण अंत झाला होता. विशेष म्हणजे तब्बल दोन तासांनंतर यवतमाळ आणि घाटंजी येथून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आर्णी येथे अग्निशमन दल नसल्याने दूरवरून हे दल पाचारण केले होते. त्यांना येण्यास प्रचंड उशीर झाला. तोपर्यंत गावकऱ्यांनी आपल्या परीने आगीवर नियंत्रण मिळविले होते.

या आगीत जयस्वाल यांच्या घरातील सर्व साहित्य खाक झाले. अन्नाचा दाणाही उरला नाही. कपडेलत्तेही जळाले. घरातील वीज उपकरणेही आगीत खाक झाली. दरम्यान, आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अबोली यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात घरातील दूरदर्शन संच, फ्रिजर, फ्रीज, पलंग, अन्नधान्य, दागिने, रोख आदी खाक झाल्याची नोंद घेतली. अंदाजे पाच ते सहा लाखांचे साहित्य खाक झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

अवघ्या गावावर पसरली शोककळा

आगीत काजल आणि परीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण आयता गावावर शोककळा पसरली. दोघींच्या मृत्यूमुळे अवघे गाव हळहळले. ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. गावात बुधवारी एकाही घरातील चूल पेटली नाही. कुणाच्याच घशाखाली अन्न गेले नाही. सायंकाळी दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर गावात परत आले. त्यावेळी संपूर्ण गावानेच हंबरडा फोडला होता. साश्रुनयनांनी गावकऱ्यांनी या दोघींनाही दु:खद अंत:करणाने निरोप दिला.

पती यात्रेला गेल्यानंतर घडले अघटित

आयता गावात मुंगसाजी माउली यांचे अनेक भक्त आहेत. ते नेमाने दरवर्षी दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथे दर्शनासाठी जातात. तेथे पुण्यतिथी महोत्सव असतो. यावर्षी बुधवारी धामणगाव देव येथे पुण्यतिथी महोत्सव होता. आयता गावातून या महोत्सवासाठी दरवर्षी पालखी जाते. यावर्षीही मंगळवारी गावातून पालखी निघाली. तिच्यासोबत काजलचे पती विनोद जयस्वालसुद्धा गेले होते. लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी ही दु:खद घटना कळताच ते तातडीने गावात परतले. यावेळी त्यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. गावकऱ्यांनी कशी तरी त्यांची समजूत काढली. बुधवारी सायंकाळी दोघांच्याही पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले.

कुटुंबात उरले केवळ मायलेक

विनोद जयस्वाल यांच्याकडे शेती नाही. त्यांच्या कुटुंबात आई प्रतिमासह पत्नी काजल आणि चिमुकली परी असे चार जण होते. विनोद ऑटो चालवीत. त्यांचे बिछायत केंद्रही आहे. त्यांच्याकडे झेरॉक्स मशीन आहे. याशिवाय ते विविध ऑनलाइन कामे करतात. मोबाइलचे रिचार्ज करून देतात. गाव आडवळणावर असल्याने अनेकांना बॅंकेत जाता येत नाही, त्यामुळे विनोद गावकऱ्यांना ऑनलाइन पैसे काढून देणे, पैसे टाकणे आदी कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. आता गर्भवती पत्नीसह चिमुकली परी मृत्यू पावल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. विशेष म्हणजे काजल गर्भवती असल्याने तिच्या पोटातील बाळही दगावले. या घटनेमुळे आयता गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातfireआगCylinderगॅस सिलेंडरDeathमृत्यूYavatmalयवतमाळ