राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्ट्र पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा म्हणून खास पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी २३ फेब्रुवारी रोजी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. शासकीय सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ३० टक्के करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार राज्य पोलीस दलात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आहे. पोलीस दलातील कामाची पद्धत व वेळेच्या अनियमिततेमुळे सर्व पोलिसांवर मानसिक ताण असतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालाच्या विश्लेषणावरून निदर्शनास आले आहे. म्हणूनच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
बाळाच्या आरोग्याचा दर्जा वाढविणारमहिला पोलिसाच्या पहिल्या प्रसूतीच्या काळात तिचा व तिच्या होणाºया बाळाच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यावर भर आहे. गरोदरपणात विशेष पोषण आहार घेता यावा म्हणून पोलीस शिपाई ते निरीक्षक या पदावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीतून पाच हजारांचे विशेष पोषण आहार अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या निधीची जबाबदारी घटक प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. गरोदर काळात महिला पोलिसांना या अनुदानासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे.‘सृदृढ बालिका अनुदान’मुलगी जन्माला आल्यास बेटी बचाव अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुलींचा जन्मदर वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तिच्या पोषणासाठीसुद्धा उपरोक्त अनुदानाव्यतिरिक्त आणखी पाच हजारांचे ‘सृदृढ बालिका अनुदान’ दिले जाणार आहे. घटक प्रमुखांनी ही रक्कमसुद्धा कल्याण निधीतून देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.