लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गं्रथ प्रदर्शन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. मंगलमूर्ती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकारात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव गोबरे होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांच्या हस्ते उद्घाटन झाले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. माधव सरकुंडे, प्रा. राजेंद्र कांबळे, एम.के. कोडापे, नायब तहसीलदार इंदूताई कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयआयटीमध्ये ९० टक्के गुण घेत यशस्वी झालेली पायल दीपकराव वैरागडे हिच्यासह रवी पुरुषोत्तम पडघान, मधू भावराव पडघान, वैष्णवी किसन गवळी, ईश्वर्या मोहनराव वाघमारे, आदित्य मिलिंद थोरात, वैष्णवी संजय इंगोले, वैष्णवी माधव पडघान, प्रफुल्ल आनंदराव महाजन, स्नेहा नरेंद्र पडघान, तुषार धर्मेंद्र पडघान, सौरभ नरेंद्र पडघान, दानवी राजू गायकवाड, ममता विष्णूजी तायडे, मयूरी गजानन रणखाम, सुषमा शंकरराव लांडगे, ममता राजेंद्र गायकवाड, योगेश विलास यंगड, वैष्णवी महादेव कांबळे, प्रियंका दिगांबर जोगदंडे, अमिता लक्ष्मण घरडे, पूनम ग्यानबाराव हेडे, प्रियंका दीपकराव वैरागडे आदी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शालेय साहित्य देण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. मंगलमूर्ती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मनोज रणखाम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आभार पंडित वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजाभाऊ इंगोले, देवीदास महाले, अॅड. सुरज पाखरे, अजाबराव रणखाम, महादेवराव थोरात, एम.यू. गायकवाड, अरविंद वानखडे, अशोक पांडव, सचिन खंडारे, मनोहर शहाकार, डॉ. डोंगरे, गजानन रणखाम, विवेक रणखाम, विजय तायडे, मनोहर कांबळे, नीलेश देहाडे, भैया देहाडे, प्रा. अरुण खंडाळकर आदींनी पुढाकार घेतला.
मातंग समाजातील गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 10:09 PM
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गं्रथ प्रदर्शन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.
ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे जयंती : मंगलमूर्ती वाचनालयाचा पुढाकार, ग्रंथप्रदर्शन, वृक्षारोपण