शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

अर्थसंकल्पात कृषी, शिक्षणाला प्राधान्य

By admin | Published: March 23, 2016 2:11 AM

कृषी आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंगळवारी विशेष सभेत सादर करण्यात

यवतमाळ : कृषी आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंगळवारी विशेष सभेत सादर करण्यात आला. आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी विविध योजनांवर ३६ कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या निधीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले. त्याला सभागृहाने मान्यता दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी अर्थसंकल्प संदर्भात विशेष सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. या सभेत अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांंनी हा अर्थसंकल्प सादर केला. मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली. त्यात कृषी, १३ वने आणि समाज कल्याणअंतर्गतच्या शेती साहित्य वाटपांच्या योजनांसाठी पाच कोटी ६२ लाख ५९ हजारांची भरीव तरतूद करण्यात आली. सभापतींचे भाषण आटोपताच सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रत्येक विभागनिहाय खर्चाचे विवरण मागितले. यावेळी समाज कल्याण विभागाकडून केवळ २० टक्के निधी खर्च झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. विविध विभागांकडून मागील वर्षीच्या एकूण महसुली उत्पन्नापैकी तब्बल १४ कोटी ८८ लाख ८४ हजार रुपये अखर्चित असल्याचे सांगण्यात आले. कृषी, शिक्षण वगळता इतर विभागातील बहुतांश निधी अखर्चित असल्याबाबत सदस्यांनी आक्षेप घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)४सर्वशिक्षा अभियानातील शाळांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी ७७ लाख रुपये देण्यात आले. मात्र ही साहित्य खरेदीची प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीकडून न करता नागपूरच्या एका कंपनीकडून थेट पुरविण्यात आले. व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकलेली रक्कम परस्परच काढून घेण्यात आली, असा मोठा अपहार झाल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.काँग्रेस सदस्यात खडाजंगी४सभेमध्ये नियोजन समितीतील ३०-५४ च्या मुद्यावरून काँग्रेस सदस्यांमध्येच खडाजंगी झाली. येथेही बोलू देत नाही, तेथेही बोलताना येत नाही, तुम्ही परस्पर मॅनेज करून निधी मिळविता हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा उघड आरोप काँग्रेस सदस्याने आपल्या पक्षाच्या सदस्यावरच केला. ४महसुली उत्पन्न २१ कोटी ८७ लाखांचे ४कृषी विभागाला तीन कोटी ५७ लाख४१३ वने अंतर्गत एक कोटी दहा लाख ४समाज कल्याणला दोन कोटी ५० लाख४महिला बालकल्याणला एक कोटी ३१ लाख४शिक्षण विभागाला ८४ लाख दहा हजार ४आरोग्य विभागाला ३३ लाख४सिंचनला २० लाख४पशुसंवर्धनला ९७ लाख ४बांधकाम विभागाला दोन कोटी ८८ लाख४जिल्हा परिषद सदस्यांना चार लाखांचा वैयक्तिक निधी४बोकड खरेदीच्या योजनेला स्थगिती ४अखर्चित निधीने आकडे फुगले