शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 7:24 PM

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे मूळ रहिवासी : ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी 

ठळक मुद्देतालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले.

यवतमाळ : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आर्णी सारख्या ग्रामीण भागातून थेट मुंबईच्या मायानगरीत पाय रोवणारे राजू कारिया (६८) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भातील पहिले आणि ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी करणारे भारतातील एकमेव पीआरओ म्हणून त्यांची ख्याती आहे. सेलिब्रेटी सिनेकलावंतांसोबत सलोख्याचे संबंध असलेल्या कारिया यांनी मूळ यवतमाळ जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत जपले. 

तालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले. परंतु शिक्षणादरम्यानच त्यांना चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड असल्याने वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांनी मुंबई गाठली. तेथे कुणीही गाॅडफादर नव्हते. अशा वेळी मोठ्या स्टुडिओच्या बाहेर त्यांनी ऑटोरिक्षा चालक म्हणून काम केले. स्टुडिओत जाणाऱ्या-येणाऱ्या एक्स्ट्रा आर्टिस्टसोबत ओळख वाढवून राजू कारिया यांनी स्टुडिओमध्ये प्रवेश मिळविला. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी स्वत:ही एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम केले. शिक्षण कमी असले तरी अंगभूत कलागुणांमुळे त्यांनी मोठमोठ्या कलाकारांची दाद मिळविली. त्यातूनच चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. अत्यल्प काळात ६५० पेक्षा जास्त सिनेमांचे पीआरओ म्हणून काम करणारे ते भारतातील एकमेव पीआरओ आहेत. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. तर विदर्भातील पहिले चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.  

यवतमाळातील मित्र परिवार शोकमग्नदोन वर्षांपूर्वी त्यांना शुगरचा आजार जडल्यावर मध्यंतरी एक पाय कापावा लागला. तरीही हसत हसत त्यांनी काम सुरू ठेवले होते. यवतमाळातील अविनाश पाचकवडेंसारख्या जुन्या मित्रांसोबत त्यांचा नित्य संवाद होता. मंगळवारी आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील चाहत्यांसह यवतमाळातील मित्र परिवारही शोकमग्न आहे. राजू कारिया यांच्या मागे पत्नी, दोन मुली, नात असा आप्त परिवार आहे 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ