मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील युवकांनी पुढाकार घेत ‘लॉकडाऊनचे किस्से’ या लघुपटाची निर्मिती केली. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती तसेच नागरिकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने नागरिकांसाठी तयार केलेली नियमावली, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियम मोडणाऱ्यांविरुद्ध झालेली कारवाई, काहींच्या मानसिकतेत झालेला बदल, या सर्व बाबी व किस्स्यांचा यात अंतर्भाव आहे. कोरोना आजाराचा शिरकाव देशात झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढू नये, याकरिता २२ मार्चपासून लॉकडाऊन आहे. गेल्या दोन महिन्यापासून नागरिक घरात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. बदललेली जीवन पद्धती लघुपटाद्वारे मांडण्यात आली. लॉकडाऊनला गांभीर्याने न घेता कथानकातील पात्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना काही ‘किस्से’ घडतात. लॉकडाऊनदरम्यान तरुणांच्या मानसिकतेमध्ये घडून आलेले चांगले बदल या लघुपटामधून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.२४ तास घरात राहून सर्वांच्या मनात सुट्टीची भावना तयार झाली. या सुट्टीत काही युवक रात्री उशिरापयंंत मोबाईलवर पबजी गेम खेळतात. त्यामुळे सकाळी उशिरा उठण्याची सवय लागल्याचे सुरूवातीला दाखविण्यात आले. किराणा, भाजीपाला आणायला गेलेल्यांना तोंडाला मास्क लावल्यानंतरच साहित्य देण्यात येईल, एवढी जागरूकता व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली. शहरात विनाकारण दुचाकीने फिरणारे, रस्त्यावर थुंकणाºया तरुणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. पोलीस, आरोग्य यंत्रणा व इतर प्रशासन देत असलेल्या सेवेची जाणीव झाल्यानंतर युवकांमध्ये झालेले बदल, समाज हिताच्या भावनेतून गरजूंना आवश्यक साहित्यांचे वाटप, या सर्व बाबी लघुपटात दाखविण्यात आल्या. ठाणेदार मनोज केदारे यांनी नागरिकांना याद्वारे संदेश दिला. या लॉकडाऊनमुळे नद्या, शहरे प्रदूषण मुक्त झाले. ओझोन वायूची पातळी वाढण्याच्या चांगल्या गोष्टींही घडल्याचे लघुपटात सांगण्यात आले.या प्रयोगाला मोठ्या प्रमाणात लाईक मिळत असून यासाठी पुढाकार घेणाºया युवकांचे कौतुक केले जात आहे. या लघुपटाच्या कथानकातील पात्र अंकित मनवर, निशांत बेंद्रे, शुभम कदम, राहुल आसळकर, पंकज अंभोरे यांनी रंगविले. चित्रीकरण शुभम जांभोरे यांनी केले. संकलन अक्षय मल्टी मीडियाचे अक्षय नाईकवाड यांनी केले. या उपक्रमासाठी पोलीस ठाणे, तहसील, नगरपरिषद, किशोर घेरवरा, आशिष वानखडे, सागर चक्रे, प्रशांत मेश्राम आदींचे सहकार्य लाभले.बोध घेण्याची अपेक्षाकोरोनावर अद्याप औषध सापडले नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय आहे. घरीच राहणे, गरज भासल्यास मास्क घालून बाहेर पडणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करणे. शासनाच्या नियमांचे पालन करणे, याबाबत वारंवार सांगण्यात येते. यावरच फोकस ठेवून हा लघुपट तयार करण्यात आला. जनजागृतीसाठी युवकांनी डीजीटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याचा सर्वांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे.
दारव्हात ‘लॉकडाऊनचे किस्से’ लघुपटाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:00 AM
गेल्या दोन महिन्यापासून नागरिक घरात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. बदललेली जीवन पद्धती लघुपटाद्वारे मांडण्यात आली. लॉकडाऊनला गांभीर्याने न घेता कथानकातील पात्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना काही ‘किस्से’ घडतात. लॉकडाऊनदरम्यान तरुणांच्या मानसिकतेमध्ये घडून आलेले चांगले बदल या लघुपटामधून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ठळक मुद्देयुवकांचा पुढाकार : कोरोना जनजागृतीसाठी डिजिटल व्यासपीठ, खुमासदार पद्धतीने नागरिकांनाही मार्गदर्शन