लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वाशिम येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपालाने केलेल्या मुलींच्या छेडखानीचा निषेध करीत विविध संघटनांनी उपविबागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.आदिवासी विकास विभागाच्या वाशीम येथील सदर वसतिगृहात अल्पवयीन मुलींची नेहमी छेडखानी करणे, त्यांच्याशाी असभ्य वर्तन करणे, सुरू होते. गृहपालाचे पती रविकांत पेटकर हा प्रकार करीत असल्याची तक्रार मुलींनी गृहपाल व अकोला येथील अधिकाºयांकडे केली. मात्र कारवाई झाली नाही. परिणामी गृहपालाच्या पतीने १७ जानेवारीला अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तन करून पुन्हा छेडखानी केली. त्यांना मारहाण, शिवीगाळ करून धमकी दिली. यामुळे मुलींनी अखेर वाशीम शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलिसांनी रविकांतविरूद्ध छेडखानी, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अॅट्रोसीटीनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र गृहपाल सुनयना पेटकर व अकोला पीओंविरूद्ध कारवाईसाटी बिरसा ब्रिगेड व महिला ब्रिगेडने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. यावेळी पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, वाघोजी खिल्लारे, बी.एन.भिसे, पी.एस. माहुरे, शिल्पा सरकुंडे, मीनाक्षी व्यवहारे, संगीता कुरकुटे, शारदा जंगले, संगीता पिंपळे, पंचफुला शिर्डी, छाया मिरासे, मालती मुकडे, वैष्णवी ठाकरे, शारदा बोंबले, महानंदा असोले, प्रियंका वैद्य, पार्वती तांबारे, उज्वला डाखोरे, दिव्या माहुरे, संध्या बोरचाटे, अपर्णा ठोंबरे, प्रियंका खाकरे, सुवर्णा मुकाडे उपस्थित होत्या.
पुसदमध्ये वाशिम येथील घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:54 PM
वाशिम येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपालाने केलेल्या मुलींच्या छेडखानीचा निषेध करीत विविध संघटनांनी उपविबागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : आदिवासी वसतिगृहातील मुलींच्या छेडखानीचे प्रकरण तापले