शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

प्रकल्प संचालक भाजप पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:27 PM

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी अनिल आडे यांना केली.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदारांचा आरोप : ‘झेडपी’ अध्यक्षांवर नियंत्रणाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी अनिल आडे यांना केली.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित व काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांचा सत्कार येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात धानोरकर यांनी जोरदार बॅटींग केली. त्यात त्यांनी प्रकल्प संचालक कुळकर्णी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले. या अधिकाºयाला जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेळीच आवर घालावा अन्यथा आपण ‘आपल्या स्टाईल’ने आवर घालण्यास सक्षम आहो, असा गर्भित इशाराही धानोरकर यांनी दिला.मते मिळाली नसली तरी विकासात राजकारण आणणार नाहीधानोरकर पुढे म्हणाले, मला काँग्रेस आघाडीने उमेदवारी दिली नसती तरी मी चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणारच होतो. आपल्याला केवळ हंसराज अहीर यांचा पराभव करायचा होता. आर्णी-केळापूर मतदारसंघात अपेक्षित मते जरी मिळाली नसली तरी आपण विकास कामात राजकारण करणार नाही. प्राधान्याने आर्णी भागावर लक्ष केंद्रित करून अ‍ॅड.मोघे यांनी हाती घेतलेला पैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, जीवन पाटील, मनीष पाटील, प्रमोद कुदळे, सचिन एलगंधेवार, जितेंद्र मोघे विराजमान होते. यावेळी खासदार धानोरकर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर समविचारी पक्षांतर्फ सत्कार करण्यात आला. खरेदी विक्री संघ, अंपग मंडळ, महिला मंडळ, सर्व नगरसेवक, व्यापारी असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्सने सत्कार केला. अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात केळापूर विधानसभा मतदार संघात कमी मते मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. डॉ.वजाहत मिर्झा यांनी आता पक्षाचे काम करणाºया कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल व काम न करणाऱ्यांना घरी बसविले जाईल, असा इशारा दिला. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष साजीद बेग, अ‍ॅड. प्रदीप वानखेडे, विलास राऊत, राजू गावंडे, चिराग शाहा, रवींद्र नालमवार, राजू शिवरामवार, राजू विरखेडे, किरण मोघे, विजय मोघे, बाळासाहेब शिंदे, खुशाल ठाकरे, परशुराम राठोड, संदीप बुटले, डॉ.रामचरण चव्हाण, उमा शिवरामवार, निता ठाकरे, सुनिता चिल्लरवार, सुरेश जयस्वाल, सुषमा सुरटकर, आर.डी. राठोड, सुनील भारती आदी उपस्थित होते. संचालन आरीज बेग, तर आभार राजू बुटले यांनी मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद