यवतमाळ : जिल्हा परिषद पंचायत विभागातील ११ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. यापूर्वीच आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवालच नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पंचायत विभागाने प्रथमच ११ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. यातील सहा जणांना विस्तार अधिकारी पंचयात तर पाच जणांची विस्तार अधिकारी कृषी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नतीच्या जागेवर रुजू होऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या कालबध्द पदोन्नतीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले होते. मात्र या प्रस्तावांमध्ये अनेक त्रृट्या आहेत. याबाबत आरोग्य कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले होते. अनेक पदोन्नती पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवालच आरोग्य विभागाजवळ नाही. ही माहिती सीईओंना दिली नाही. आरोग्य विभागातील ४४ कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नती तर १४४ कर्मचाऱ्यांना प्रथमच पदोन्नती दिली जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचा २४ वर्षापूर्वीचा गोपनीय अहवाल प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र हा अहवाल नसल्याने प्रस्ताव रखडले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
ग्रामविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती
By admin | Published: January 12, 2015 10:59 PM