लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आगामी सणोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून वणी पोलीस गुन्हेगारांवर वॉच ठेऊन आहेत. सातत्याने गुन्हे करणाऱ्या वणी शहरातील सहा व ग्रामीण भागातील एक, अशा सात जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव वणी पोलिसांनी तयार करून तो मंजुरीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.पोळा, गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव व त्यापुढे असणारे सण लक्षात घेता, हे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी वणी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांनी गेल्या १५ दिवसांपासून शहरात विशेष मोहिम राबविली आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज स्वत: एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन शहरातून पायदळ पेट्रोलिंग करीत आहेत. पेट्रोलिंगदरम्यान चौकाचौकात कॉर्नर सभा घेऊन या अधिकाऱ्याने नागरिकांना सणोत्सवाच्या संदर्भाने मार्गदर्शन करून शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील मुख्य मार्गावरील संशयीत दुकानांची झडती घेऊन काही आपत्तीजनक वस्तू सापडतात की काय, याचीदेखील चाचपणी केली.शहरातील प्रत्येक बिट जमादारामार्फत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सणोत्सवादरम्यान कुठे अनुचित प्रकार घडत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी बिट जमादारांनी नागरिकांना केले.केवळ वणी शहरच नाही, तर ग्रामीण भागातदेखील पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथील नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले. पोलिसांनी वणी शहरात पेट्रोलिंग वाढविली असून गुन्हेगारांवर वॉच आहे. गणेशोत्सव काळात बंदोबस्तासाठी यवतमाळ येथून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. पोलीस दप्तरी गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सध्या फरार असलेल्या आरोपींचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे. रात्रीच्यावेळी मुख्य मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली जात आहे.पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे अटकेच्या भितीने शहरातील गुन्हेगार अगोदरच भूमिगत झाले आहेत. त्यांचाही शोध पोलीस पातळीवर घेतला जात आहे.पाचजण हद्दपारसातत्याने गुन्हे करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाºया पाचजणांना वणी पोलिसांनी १४४ (२) अंतर्गत नोटीस बजावून सणोत्सवाच्या काळात वणी शहर सोडण्याचे आदेश बजावले आहे. तसेच अवैध दारूविक्रेते, जुगार खेळणाऱ्यांवर सातत्याने कारवाया करून त्यांना अटक केली. धाडसत्र अद्यापही सुरूच आहे.अवैध दारूविक्रीचे पोलिसांपुढे आव्हानवणी शहर शांत शहर म्हणून ओळखले जाते. सणोत्सवाच्या काळात शहरात अनुचित प्रकार घडल्याचा इतिहास नाही. त्यामुळे पोलिसांवर केवळ बंदोबस्ताचा ताण असतो. अनुचित घटना घडत नसल्या तरी या काळात मोठ्या प्रमाणावर बंदच्या दिवशी अवैध दारू विकली जाते. त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
वणीतून सात गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:18 PM
पोळा, गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव व त्यापुढे असणारे सण लक्षात घेता, हे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी वणी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांनी गेल्या १५ दिवसांपासून शहरात विशेष मोहिम राबविली आहे.
ठळक मुद्देक्रीयाशील गुन्हेगारांवर ‘वॉच’ : सण-उत्सवातील शांततेसाठी पोलिसांचे प्रयत्न