लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघांचे अस्तित्व, शिकारी, हमखास व्याघ्र दर्शन यामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्याची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे.पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र कमी पडते आहे. त्यामुळे हे वाघ अभयारण्याबाहेर येतात. गावात व शेतशिवारात त्यांचा शिरकाव होतो. त्यातूनच मानवी व पाळीव जनावरांच्या शिकारी वाढतात. शेतकरी-शेतमजुरांना शेतात जाणेही धोकादायक ठरते. त्यातून जनक्षोभ निर्माण होण्याची भीती असते.उपरोक्त बाबी विचारात घेऊन टिपेश्वर अभयारण्याचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे. पारवा वनपरिक्षेत्रातील पारवा, कुर्ली, किन्ही हा परिसर या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो. आणखी काही गावे अभयारण्याला जोडता येतील का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?ही गावे समाविष्ट केल्यास गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?, ते सहजासहजी त्यासाठी तयार होतील का?, त्यांना किती मोबदला द्यावा लागेल या दृष्टीनेही माहिती गोळा केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यांचीही अशीच हद्दवाढ केली गेली. त्याच धर्तीवर आता टिपेश्वरमध्ये हद्दवाढीचा प्रयोग राबविला जाणार आहे.हिशेबाची जुळवाजुळवटिपेश्वर अभयारण्यपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. आता तेथून काढून त्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे. परंतु या कनेक्टीव्हीटीला ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकले गेले आहे. हिशेबाची जुळवाजुळव हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते.वाघाचे अभयारण्याबाहेर निघणे धोकादायकवाघांची संख्या अधिक व अभयारण्याचे कार्यक्षेत्र कमी यामुळे वाघ अभयारण्याबाहेर निघतात. ही बाब त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. कारण परप्रांतीय शिकाऱ्यांची या अभयारण्यावर व तेथील वाघांवर सतत नजर असते. वाघांनी अभयारण्याबाहेर निघणे गावकऱ्यांसाठीही तेवढेच धोकादायक आहे. या वाघांना अभयारण्यातच ठेवता यावे म्हणून अभयारण्याची हद्द आता वाढविली जाणार आहे.मंत्र्यांना हवा ‘टायगर प्रोजेक्ट’पांढरकवडामध्ये पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या संबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
‘टिपेश्वर’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:00 AM
पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते.
ठळक मुद्दे१८ वाघांच्या अस्तित्वाची नोंद : मेळघाट कनेक्शन महिनाभर लांबणीवर