शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

टेक्सटाईल झोनसाठी दोन उद्योजकांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 9:29 PM

गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देएमआयडीसी : मुंबईतून हवी मंजुरी, पाणी शुद्धीकरणातून सूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प्रतीक्षा आहे.काही वर्षांपूर्वी यवतमाळात भोयर या विस्तारित एमआयडीसीत टेक्सटाईल झोन जाहीर करण्यात आला. ९७ हेक्टर अर्थात सुमारे अडीचशे एकर जागेत हा झोन निर्धारित आहे. प्रत्येकी दहा हजार चौरस मीटरचे १३ भूखंड तेथे उद्योगांसाठी थाटण्यात आले आहेत. आवश्यक सोई-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु गेली काही वर्ष या टेक्सटाईल झोनकडे कुणी फिरकलेच नाही. उद्योजकांनी तेथे येऊन आपले उद्योग सुरू करावे या दृष्टीने राजकीय स्तरावरून फारसे प्रयत्न झाले नाही. राजकीय उदासीनता असल्याने प्रशासनानेही मग त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आता भाजप-शिवसेना युती सरकारचा कार्यकाळ अवघ्या चार महिन्यांवर आला आहे. गेली पाच वर्ष किती उद्योग आणले, किती हातांना रोजगार दिले असा प्रश्न जनतेतून विचारला जाण्याची भीती जिल्ह्यातील सात पैकी संख्येने सहा असलेल्या युतीच्या आमदारांना आहे. त्यामुळेच आता सारवासारव केली जात असल्याची माहिती आहे. त्यातूनच एमआयडीसीत नवे उद्योग येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते.यवतमाळच्या या टेक्सटाईल झोनला अखेर दोन उद्योजकांनी पसंती दिल्याची माहिती आहे. त्यांनी येथे उद्योग थाटण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव एमआयडीसीच्या मुंबई मुख्यालयाला दिला आहे. प्राथमिक मंजुरीनंतर त्यांना उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहे. टेक्सटाईल उद्योगात पाणी शुद्धीकरण प्रकल्प (सीईटीपी) महत्वाचा आहे. परंतु प्रस्तावित या दोन उद्योगात कलरिंगचे (डार्इंग) कोणतेही काम होणार नसल्याने पाणी अशुद्ध होण्याचा प्रश्नच नाही. यामुळे या उद्योगांकडून ‘दूषित पाणी निघणार नाही’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे हे दोन उद्योग तरी किमान टेक्सटाईल झोनमध्ये सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या मंजुरी, भूखंड मंजुरी व अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष उद्योग सुरू होण्यास आणखी किती कालावधी लागतो हे पाहणेही महत्वाचे ठरते.बंद उद्योगाची माहिती मागितलीयवतमाळच्या एमआयडीसीत रेमंड हा एकमेव मोठा उद्योग सुरू आहे. त्यालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. येथील ओरिएंट, हिंदुस्थान हे उद्योग बंद पडले आहे. ओरिएंटच्या मालमत्तेचा न्यायालयाने हर्रास केला. तर हिंदुस्थानचे सेटअप तयार आहे. केवळ तेथे मशीनरीजची आवश्यकता आहे. अलिकडेच या एमआयडीसीच्या कार्यालयाकडे हिंदुस्थान या बंद पडलेल्या उद्योगाची सद्यस्थिती, तेथील वीज पुरवठा, पाणीपुरवठा याबाबत एमआयडीसीच्या मुंबई मुख्यालयातून चौकशी करण्यात आली होती, असे सांगण्यात येते. त्यामुळे हिंदुस्थान कंपनी पुन्हा येथे आपला उद्योग पुन्हा कार्यान्वित करणार काय ? याची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी